- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वाढती बेरोजगारी आणि चैनीची जीवनशैली जगणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे झटपट पैश्याच्या नादात अवैध धंद्यांसह चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशातच इतर ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांसह एका चोरट्याने चक्क जागृत लंगडा मारुती मंदिराच्या पैश्यावर डल्ला घातल्याचे उघडकीस आले आहे.चोरट्याने दरवाजा तोडून मंदिरातील दानपेटीच उचलून नेली होती व पैसे काढल्यानंतर आरोपीने सदर दानपेटी डोलारा तलावात फेकून दिली होती.पोलीस त्याच्या मागावर होते.अशातच आरोपी हा नुकताच तेलंगाना राज्यात एका चोरीच्या प्रकरणात तेथील कारागृहात शिक्षा भोगत होता.तेथून सुटून आल्यानंतर त्याला भद्रावती पोलिसांनी अटक केली.सदरची घटना भद्रावती शहरातील पंचशील नगर येथील जागृत लंगडा मारुती मंदिरात घडली.चोरी प्रकरणी शुभम विठ्ठल झाडे,वय २९ वर्षे,रा.झाडे प्लॉट,भद्रावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सदरची कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिसांनी केली आहे.
- Advertisement -

