Monday, August 17, 2026
Homeआरमोरीमालवाहू ट्रकची सायकलला जोरदार धडक; २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू..

मालवाहू ट्रकची सायकलला जोरदार धडक; २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-शहरातील जानकाबाई कोल्हे कॉन्व्हेन्टमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच वर्षीय मुलाला आणण्यासाठी सायकलने जात असतांना वाटेतच मालवाहू ट्रकने सायकलला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल,बुधवारी १८ डिसेंबरच्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरमोरी शहरातील छत्रपती चौक वळणावर पोस्ट कार्यालयासमोर घडली.किरण संजय गोंदोळे  रा.बर्डी परिसर,आरमोरी असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,मालवाहू ट्रक क्रमांक-एमएच ३४ एव्ही १२९६ हा देसाईगंजहून गडचिरोलीकडे जात होता तर किरण गोंदोळे ह्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी सायकलने जात असतांना वाटेतच मालवाहू ट्रकने सायकलला जोरदार धडक दिली. जोरदार धडक बसताच सायकल ट्रकच्या आतमध्ये गेली तर किरण यांच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटना घडताच घटनास्थळी बघ्यांचा मोठा जमाव झाल्याने शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती आरमोरी पोलीस प्रशासनास कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुगणालयात पाठविला.ट्रक चालक मनिषकुमार विरबहादुरसिंग रा.कोलवारा,बिहार यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!