- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा काय होणार? असे मानून कमी वयाची मुले-मुली शहरी भागासह ग्रामीण भागात सुसाट वेगाने वाहने चालवीत वाहन कायद्याचे उल्लंघन करतांना दिसून येतात.अशातच आता
कोणतेही वाहन १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक चालवितांना आढळल्यास तेथेच वाहन जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावे; असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत.
याशिवाय मालवाहतुकीसाठी २० वर्षे ही वयोमर्यादा असून ती कठोरपणे पाळण्यात यावी; असेही आदेश देण्यात आले आहेत.ई-चलनाबाबतही आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे.वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ.सुरेशकुमार मेकला यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.ई-चलन जारी करणे आणि दंडात्मक वसुलीसह वाहन जप्तीबाबत ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे.१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास पोलिसांकडून वाहन ताब्यात घेतले जाते.संबंधित चालकाच्या पालकांना वा संबंधित व्यक्तीला पाचारण केले जाते.चालक तसेच पालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.आता नव्या परिपत्रकानुसार पोलिसांना वाहन जप्तीचीही कारवाई करावी लागणार आहे.
- Advertisement -

