Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरबिबट मादीने शेजारील शेतीत तीन पिल्लांना दिला जन्म...

बिबट मादीने शेजारील शेतीत तीन पिल्लांना दिला जन्म…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-प्रादेशिक वनविभागाच्या मुल तालुक्याच्या चिचाळा बिटात एका बिबट मादीने शेजारील शेतीत तीन पिल्लांना जन्म दिला.बिबट मादीने ही तीनही पिल्ले धान शेतीत लपवून ठेवले होते.शेतमालकाच्या नजरेत पडताच सदरची घटना उघडीस आली.याबाबत शेत मालकाने वनविभागाला माहिती दिली.त्यामुळे  परिसरातील धान कापणीवर परीणाम पडल्याने वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट मादी व तिच्या पिलावर लक्ष ठेवून आहेत.धानाच्या शेतीतून बिबट मादीने ही तिनही पिल्ले हलवून जंगलात नेल्याचे बोलल्या जात आहे.

चिचाळा बिटात अंगारी गणपत कवडू सोनुले यांची धानाची शेती आहे.सर्वत्र धानाची कापणी सुरू आहे. सोनुले हे शेतातील धानाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना मादी बिबट्याचे दर्शन झाले. तसेच धान पिकातून हालचाली होत असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी चिचाळा बिटाच्या वन कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.त्यांनी आपल्या ताफ्यासह पाहणी केली असता तीन पिल्ले निदर्शनास आले.दोन दिवसांआधी धान पिकात लपवून ठेवलेली तिन्ही पिल्ले मादी बिबटयाने तिथून हलवून परत जंगलात नेल्याचे बोलल्या जात आहे.एका ठिकाणी पिल्लांना जन्म दिल्यानंतर वन्यप्राणी त्यांना सुरक्षितेच्या कारणावरून इतरत्र हलवित असतात, असे एका वनकर्मचाऱ्याने सांगितले.मादी बिबट आणि तिनही पिल्लांकडे प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.वनविभाग तसेच वन्यप्रेमीसाठी ही घटना सुखकर,आनंदाची असली तरी या परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.त्याचा परिणाम धान कापणीवर होत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या भागात वन कर्मचारी तसेच वनमजूर गस्त करीत असल्याचे चिचाळा बिटातील वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!