Monday, August 31, 2026
Homeगोंदियासेवानिवृत्त परिचाराला सातव्या वेतन आयोगाचा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजाराची लाच... -...

सेवानिवृत्त परिचाराला सातव्या वेतन आयोगाचा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजाराची लाच… – लाच प्रकरणी मुख्याध्यापक,सहाय्यक शिक्षक व शाळेची देखभाल करणारा खासगी व्यक्ती अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-सेवानिवृत्त परिचाराला सातव्या वेतन आयोगाचा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व शाळेची देखभाल करणाऱ्या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम मांडोखालटोला येथील प्रशिक विद्यालयात सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.लाचखोर आरोपींमध्ये प्रभारी मुख्याध्यापक विलास गोपाळा नाकाडे वय ५६ वर्षे,सहाय्यक शिक्षक अशोक पांडुरंग लंजे वय ५४ वर्षे व ज्ञानेश्वर वामन नाकाडे वय ३६ वर्षे,रा. कोरंबीटोला यांचा समावेश आहे.
अर्जुनी-मोरगाव येथील ६५ वर्षीय तक्रारदार हे मांडोखालटोला येथील प्रशिक विद्यालयात परिचर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.सातव्या वेतन आयोगाच्या तीन हप्त्यांची रक्कम प्राप्त करण्यासाठी ते शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास नाकाडे,वेतन व भत्त्याचे बिल तयार करणारे शिक्षक अशोक लंजे व शाळेच्या कार्यकारिणीने दिलेल्या कुलमुखत्यार पत्रानुसार शाळेची देखभाल करणारे खासगी व्यक्ती ज्ञानेश्वर नाकाडे यांना भेटले असता,त्यांनी १५ हजार रुपये लाच मागितली तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १४ ऑक्टोंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पथकाने १५ ऑक्टोंबर रोजी पडताळणी केली असता तिघा आरोपींनी तक्रारदाराकडे सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते मिळवून देण्याकरिता १५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली.तर शिक्षक अशोक लंजे याने लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले.यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी तिघा आरोपींना प्रशिक विद्यालयातून ताब्यात घेतले असून अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, उमाकांत उगले,सहायक फौजदार करपे,हवालदार मंगेश कहालकर,नायक पोलिस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे,अशोक कापसे,प्रशांत सोनवाने,महिला शिपाई संगीता पटले,रोहिणी डांगे,चालक शिपाई दीपक बाटबर्वे आदींनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!