Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजाहीर सभेत भाजप उमेदवाराची जीभ घसरली.. - गावात रोज-रोज येऊन तुमचे काय...

जाहीर सभेत भाजप उमेदवाराची जीभ घसरली.. – गावात रोज-रोज येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतांनाच काही उमेदवार व नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर,खासदार धनंजय महाडिक यांच्यानंतर आता पक्षाचे नांदेडच्या किनवटमधील उमेदवार भीमराव केराम यांचे बेताल वक्तव्य समोर आले आहे.रोज-रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे वक्तव्य भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी केले.विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे या व्यासपीठावर उपस्थित असतांनाच केराम यांनी हे वक्तव्य केले.केराम यांच्या प्रचारार्थ बोधडी येथे पंकजा मुंडे यांची जाहीर सभा झाली. दरम्यान,गेल्या निवडणुकीपासून आमदार केराम गावात फिरकले नाहीत; अशी तक्रार नागरिक करीत असतात.यावर केराम यांची जीभ घसरली. मंत्रालयात काम असते,तेथे वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचे काम मी करतो,गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? असे ते म्हणाले.या वक्तव्यावरून केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.केराम यांच्यासाठी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली होती.त्यानंतर सोमवारी पंकजा मुंडेही प्रचारासाठी आल्या होत्या.केराम यांच्या विरोधात राकाँ शरद पवार गटाचे प्रदीप नाईक रिंगणात आहेत.केराम यांच्या मुका घेण्याच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!