चंद्रपूर :-प्रादेशिक वनविभागाच्या मुल तालुक्याच्या चिचाळा बिटात एका बिबट मादीने शेजारील शेतीत तीन पिल्लांना जन्म दिला.बिबट मादीने ही तीनही पिल्ले धान शेतीत लपवून ठेवले होते.शेतमालकाच्या नजरेत पडताच सदरची घटना उघडीस आली.याबाबत शेत मालकाने वनविभागाला माहिती दिली.त्यामुळे परिसरातील धान कापणीवर परीणाम पडल्याने वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट मादी व तिच्या पिलावर लक्ष ठेवून आहेत.धानाच्या शेतीतून बिबट मादीने ही तिनही पिल्ले हलवून जंगलात नेल्याचे बोलल्या जात आहे.
बिबट मादीने शेजारील शेतीत तीन पिल्लांना दिला जन्म…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चिचाळा बिटात अंगारी गणपत कवडू सोनुले यांची धानाची शेती आहे.सर्वत्र धानाची कापणी सुरू आहे. सोनुले हे शेतातील धानाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना मादी बिबट्याचे दर्शन झाले. तसेच धान पिकातून हालचाली होत असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी चिचाळा बिटाच्या वन कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.त्यांनी आपल्या ताफ्यासह पाहणी केली असता तीन पिल्ले निदर्शनास आले.दोन दिवसांआधी धान पिकात लपवून ठेवलेली तिन्ही पिल्ले मादी बिबटयाने तिथून हलवून परत जंगलात नेल्याचे बोलल्या जात आहे.एका ठिकाणी पिल्लांना जन्म दिल्यानंतर वन्यप्राणी त्यांना सुरक्षितेच्या कारणावरून इतरत्र हलवित असतात, असे एका वनकर्मचाऱ्याने सांगितले.मादी बिबट आणि तिनही पिल्लांकडे प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.वनविभाग तसेच वन्यप्रेमीसाठी ही घटना सुखकर,आनंदाची असली तरी या परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.त्याचा परिणाम धान कापणीवर होत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या भागात वन कर्मचारी तसेच वनमजूर गस्त करीत असल्याचे चिचाळा बिटातील वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

