- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या लोहारा येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार दिनांक-४ नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली.वामन बाजीराव कुमरे वय ४५ वर्षे,रा. लोहारा,ता.आरमोरी असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शेतकरी वामन कुमरे व त्यांचा १७ वर्षीय मुलगा सुमित कुमरे हे दोघेही मिळून स्वमालकीच्या शेतातील कापलेले धान्य पाहण्याकरिता सकाळच्या सुमारास शेतावर गेले होते. धान्य पाहणी करीत असतांना वामन यांना शौचास लागली.त्यामुळे ते शेतानजिक असलेल्या तलावाजवळ गेले.तलावाजवळ गेले असता वामन यांना मिर्गीचे दौरे येऊ लागल्याने ते तलावातील पाण्यात पडले व त्यांचा त्यातच करून अंत झाला. काही काळ होऊनही वडील परत आले नसल्याने मुलाने तलावाकडे जाऊन बघितले असता वडील तलावात तरंगताना आढळून आल्याने मुलाने आरडाओरडा करून घटनेची माहिती गावातील नागरिकांना दिली.लगेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गावातील पोलीस पाटील यांना घटनेबाबत कळविले असता आरमोरी पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी तलावातील मृतदेह बाहेर काढून मृताचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे पाठवीण्यात आला.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

