Monday, July 13, 2026
Homeनागपूरआता तेलाची फोडणी आणखी महागणार..

आता तेलाची फोडणी आणखी महागणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन महिन्यांत खाद्यतेलाच्या किंमतीत २५ ते ३५ टक्के वाढ झाली.आता थायलंडने कच्च्या पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी टाकल्याने भारतात पाम तेल आणि सोयाबीनसह अन्य खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.पाम तेलाचा सर्वाधिक उपयोग रेस्टॉरंट,हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानात होतो. तेलाच्या दरवाढीमुळे खाद्यपदार्थही महाग होऊ शकतात.केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविल्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. दिवाळीत गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी जास्त दरात तेल खरेदी करावे लागले.दरवाढीवर देशस्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविल्यानंतरही देशात डिसेंबरपर्यंत पुरेल एवढा खाद्यतेलाचा साठा आहे.परंतु केंद्र सरकारची घोषणा होताच खाद्यतेल उत्पादक कंपन्या आणि मोठ्या वितरकांनी तेलाचे दर अचानक वाढविले.त्याची झळ गरीब आणि सर्वसामान्यांनी दिवाळीत बसली.दरवाढीवर देशस्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.जागतिक स्तरावर तेलबियांच्या उत्पादनात घट झाली आहे.सोबतच रशियानेही सूर्यफूल तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केली. मलेशिया देशातही दर आठवड्यात जारी होणाऱ्या तेलबियांच्या उत्पादन आकडेवारीत घसरण होत आहे. यासह अनेक कारणांनी तेलाच्या किमतीत निरंतर वाढ होत आहे.अशा स्थितीत आयातदार पर्याय म्हणून थायलंडकडे डोळे लावून बसले होते; परंतु खरेदी सुरू होण्याआधीच थायलंडने कच्च्या पाम तेलाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावले.ते डिसेंबरपर्यंत सुरू राहील.त्यामुळे पाम तेलासह अन्य तेलांच्या किमती वाढतील.थायलंड पाम तेलाचा तिसरा सर्वांत मोठा निर्यातदार आहे.जागतिक निर्यातीत ६ ते ७ टक्के वाटा आहे.या देशासाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे.सन २०२४ मध्ये ८ ते ९ लाख टन कच्च्या पाम तेलाच्या निर्यातीची शक्यता आहे.भारत सरकारने खाद्यतेलाच्या किंमतीबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास किमती नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात; असे तज्ज्ञांचे मत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!