- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील कहार मोहल्ल्यात काल, शनिवार दिनांक-२ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.किरण राजू पंडेलगोत अंदाजे वय ३५ वर्षे,रा.वैरागड,ता.आरमोरी, जि.गडचिरोली असे मृत पत्नीचे नाव आहे.
पती राजू उर्फ पन्ना परसराम पंडेलगोत वय ४० वर्षे याचे पत्नी किरणसोबत घटनेच्या दिवशी कडाक्याचे भांडण झाले.भांडण सुरू असतांना राजू चा राग अनावर झाला.त्यातच त्याने पत्नीला बेशुध्द पडेपर्यंत बेदम मारहाण केली.पत्नी बेशुध्द पडताच कुटुंबीयांनी तिला वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले.उपचारार्थ दाखल केले असता
वैद्यकीय अधिकारी विजय धुमाळे यांनी तपासणी अंती किरणला मृत घोषित केले.त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तसेच गावातील पोलिस पाटील गोरखनाथ भानारकर यांनी सदर घटनेबाबत आरमोरी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करीत आरोपी पती राजू यास अटक करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रदीप लांबतुरे करीत आहेत.
माहितीनुसार,आरोपी राजू हा हमालकीचे काम करायचा पत्नीही रोजंदारी,शेतमजुरी व इतर कामे करून कुटुंबासाठी हातभार लावायची.किरण पश्चात नऊ वर्षाचा मुलगा व पाच वर्षाची मुलगी असून आईच्या हत्येने दोन्ही मुले पोरकी झाली.
- Advertisement -

