- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात ७८ वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना आज,बुधवारी ३० ऑक्टोंबरच्या दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.वृध्द इसम हा गाव शिवारातील जंगलात जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता.सदरची घटना भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव शिवारात घडली असून श्रीराम मडावी वय ७८ वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव हे जंगल व्याप्त गाव आहे.आज बुधवारी घटनेच्या दिवशी मृत श्रीराम मडावी हे गावालगतच्या शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते.चारा काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे.
- Advertisement -

