Thursday, September 3, 2026
Homeभंडाराभरदिवसा चोरट्यांनी फळ विक्रेत्या महिलेला चाकूचा धाक दाखवित सोन्याचे दागिने पळविले...

भरदिवसा चोरट्यांनी फळ विक्रेत्या महिलेला चाकूचा धाक दाखवित सोन्याचे दागिने पळविले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-लाखनी तालुक्यातील पोहरा-पेंढरी रस्त्यावर असलेल्या फळ दुकानात जाऊन चोरट्यांनी विक्रेत्या महिलेला चाकूचा धाक दाखवित सोन्याचे दागिने लुटून नेले असल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भरदिवसा घडली.यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंदना शंकर दिघोरे वय ४७ वर्षे रा.पोहरा असे फळ विक्रेत्या महिलेचे नाव आहे.
वंदना दिघोरे यांचे पोहरा-पेंढरी रस्त्यावर फळ विक्रीचे दुकान आहे.शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तीन अनोळखी इसम दुकानात येऊन चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यात असलेले सोन्याचे दागिने हिसकावले.या दागिण्यांची किंमत ३२ हजार रुपये सांगण्यात येते.
पीडित महिलेने लाखनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.गळ्यातील दागिने पळवित
चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला.शनिवारी पालांदूरचा आठवडी बाजार असताना चोरट्यांनी लाखनी-पालांदूर रस्त्यावर भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत भुरटे चोर मुद्देमाल व अन्य साहित्य लंपास करीत आहेत.पोलिसांची गस्त होत असली तरी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!