Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरहो-नाही,म्हणता-म्हणता अखेर आमदार जोरगेवार यांनी 'कमळ' घेतला हाती... -आज भरणार उमेदवारी अर्ज..

हो-नाही,म्हणता-म्हणता अखेर आमदार जोरगेवार यांनी ‘कमळ’ घेतला हाती… -आज भरणार उमेदवारी अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-येथील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी काल,रविवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला.चंद्रपूर येथे वने व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असून  जोरगेवार हे आज,सोमवारी २८ ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
जोरगेवार कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत गेल्या महिनाभरापासून हो – नाही चे राजकीय नाट्य रंगले होते.काँग्रेसने त्यांना दरवाजा बंद केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या.मात्र,तेथेही त्यांचा पक्षप्रवेश हुकला.दरम्यान, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशावरून सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीचे नाट्य घडले. चंद्रपूर येथील काही कार्यकर्त्यांनीही भाजपश्रेष्ठींना विरोध नोंदविला.त्यानंतर जोरगेवार यांनी आपण अपक्ष निवडणूक लढणार,असे माध्यमांवर जाहीर केले होते.मात्र त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि जोरगेवार यांचा काल,रविवारी भाजप प्रवेश निश्चित झाला.त्यानुसार वरिष्ठांच्या उपस्थित त्यांनी प्रवेश घेतला.
यावेळी वने व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या
पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकत वाढली असल्याचे सांगून त्यांच्या प्रवेशामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.एवढेच नाही तर आपल्या शब्दाबाहेर कोणताही कार्यकर्ता नसल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.त्यामुळे भाजपमध्ये जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामुळे बंडखोरी होण्याची शक्यता मावळली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!