Monday, July 13, 2026
Homeनागपूरलाच प्रकरणातील आरोपी शेतकऱ्याची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता..

लाच प्रकरणातील आरोपी शेतकऱ्याची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपण नेहमी बघतो की,एखादा लाचखोर व्यक्ती लाच प्रकरणात दोषी आढळू नये; याकरीता शक्कल लढवून दुसऱ्यांच्या माध्यमातून लाच घेण्याचे दर्शवितो.त्यामध्ये मुख्य आरोपी तर सापडतोच,मात्र इतरही व्यक्ती त्यात गोवले जातात.असाच प्रकार वन विभागात उघडकीस आला.प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लाच प्रकरणामधील आरोपी शेतकऱ्याची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.सिद्धार्थ लक्ष्मण गजघाटे असे आरोपीचे नाव असून,तो इंदापूर, ता. भिवापूर येथील रहिवासी आहे.तक्रारकर्ते किशोर शंभरकर यांनी वनामधून परवानगीशिवाय लाकडे आणली होती.त्यामुळे मुख्य आरोपी वनरक्षकाने त्यांच्याकडून सुरुवातीला एक हजार रुपयाची लाच घेतली व त्यानंतर परत १५०० रुपयांची मागणी केली. दरम्यान,वनरक्षकाच्या सांगण्यावरून गजघाटेने ती रक्कम स्वीकारली.त्यामुळे ३० जून २००६ रोजी विशेष सत्र न्यायालयाने त्याला एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.त्या निर्णयाविरुद्ध गजघाटेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.गजघाटेतर्फे ॲड.अनुप डांगोरे यांनी बाजू मांडली.त्यांनी संबंधित रक्कम लाचेची होती, याची माहिती गजघाटेला नव्हती,हे सिद्ध केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!