Sunday, September 6, 2026
Homeभंडारा१३ खातेधारकांची रक्कम देण्यास टाळाटाळ; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका.!

१३ खातेधारकांची रक्कम देण्यास टाळाटाळ; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका.!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राष्ट्रीयकृत बँकांऐवजी पतसंस्था वा काही सोसायट्या फिक्स डीपॉजिट म्हणजेच मुदत ठेव रकमेवर मोठा व्याज देत असल्याने अनेकजण यात गुंतवणूक करीत असतात.पण,काही सोसायट्या वा पतसंस्था खातेधारकांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बऱ्याच ठिकाणी उघड झाले आहे.असाच काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे.भंडारा शहरातील गुरुकृपा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने तब्बल १३ मुदत ठेव खातेधारकांची रक्कम कालावधी पूर्ण होऊनही देण्यास टाळाटाळ केल्याने प्रकरणी खातेधारकांनी भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली.ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सोसायटीच्या शाखा व्यवस्थापक आणि अध्यक्षांवर मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल दंड, तक्रारीचा खर्च आणि व्याजासह ठेवीच्या परतफेडीचे आदेश दिले.त्याचबरोबर सदरची रक्कम ही संबंधित खातेधारकांना एका महिन्यात देण्यात यावी,असेही आदेशात नमूद करण्यात आले.यात ज्ञानदीप रामटेके(ठाणा),त्रिवेणी पांडुरंग बेलेकर (शहापूर),सचिन पांडुरंग बेलेकर(शहापूर),रमेश बळीराम साठवणे,सुरेश देवचंद चांदेवार,दीपक पांडुरंग बेलेकर (शहापूर),भास्कर बिसन साकुरे,मनोज भास्कर साकुरे, पारबताबाई भास्कर साकुरे,ममता दीपक बेलेकर (शहापूर),वंदना रमेश साठवणे(ठाणा पेट्रोल पंप),दिनकर आनंदराव क्षीरसागर,नंदिनी दिनकर क्षीरसागर इत्यादी १३ खातेधारकांचा समावेश आहे.सर्व १३ ग्राहकांनी गुरुकृपा अर्बन को-ऑप. सोसायटीमध्ये मुदत ठेवीअंतर्गत रक्कम गुंतविली होती.त्यासाठी निर्धारित दरानुसार व्याजही देण्याचे ठरले होते.आपल्या ठेवीची परिपक्वता पूर्ण झाल्यावर या ग्राहकांनी रकमेच्या परताव्याची मागणी केली.मात्र,टाळाटाळ करण्यात आली.समाधानकारक उत्तरही मिळाले नाही.त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर या ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील केले.प्रकरणी आयोगाने नोटीस बजावूनही अध्यक्ष आणि व्यवस्थापकाने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आयोगाने दोघांनाही दणका दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!