Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरमाणुसकी हरपली..! शेतकऱ्याला किडनी विकण्याचा सल्ला अन् केली कर्ज वसुली.. - आठ...

माणुसकी हरपली..! शेतकऱ्याला किडनी विकण्याचा सल्ला अन् केली कर्ज वसुली.. – आठ लाख रुपयांना विकली किडनी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात धक्कादायक तितकीच माणुसकी हरपलेली घटना उघडकीस आली आहे.एकीकडे शासन मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांप्रती मोठी आस्था दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे; तर दुसरीकडे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःची किडनी विकण्याची वेळ येत आहे.यांस जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध सावकारी करणारे चक्क शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्याचे विदारक सत्य चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात उघडकीस आले आहे.तंत्रज्ञानाच्या युगात आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न किती भीषण आणि त्यांची अवस्था किती दयनीय आहे,हे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या प्रसंगावरून दिसून आले आहे.एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी थेट आपली किडनी विकण्यास भाग पाडल्याची घटना घडली असून मिंथूर गावातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.
शेतकरी रोशन कुडे यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.यासाठी त्यांनी दुधाळ गाई खरेदीसाठी  खासगी सावकाराकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले.मात्र,काही कालावधीतच गायी मृत्युमुखी पडल्या.तसेच,शेतीतून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न न झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला.कर्ज घेतलेल्या सावकाराकडून सातत्याने पैशांचा तगादा सुरू झाला.अश्यातच सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला.त्यानुसार,शेतकरी रोशन कुडे हे आधी कोलकाता आणि नंतर तिथून कंबोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना स्वतःची किडनी विकली.सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे.घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!