Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूरहायकोर्टाची चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस..-उत्तर मागविले ४ आठवड्यात….

हायकोर्टाची चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस..-उत्तर मागविले ४ आठवड्यात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- महाराष्ट्रातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाप्रमाणे चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी शासन निर्णयानुसार सफाई कामगार,कक्षसेवक,सुरक्षा रक्षक,ऑपरेटर,वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक,स्वयंपाकी लिपिक इत्यादी काल्पनिक पदांवर दरवर्षी ११ महिन्यांसाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येते.राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मे २०२० मध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अशी ५६२ कंत्राटी पदे भरण्याकरिता राबविलेल्या निविदा प्रक्रियेत १९० सफाई कामगार व ४५ सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.या मध्ये निवड झालेल्या कंत्राटदारांना ११ महिन्याचा विलंब करून एप्रिल २०२१ मध्ये काम सुरू करण्याचे लेखी आदेश देण्यात आले.लेखी आदेश देताना १९० स्वच्छता कामगार व ४५ सुरक्षा रक्षकांच्या पदांची मंजुरी रद्द करण्यात आली.एक महिन्यानंतर आपल्याच आदेशाला केराची टोपली दाखवून सुरक्षा रक्षकांच्या ४५ पदांना पुन्हा मंजूर देऊन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली.मात्र कोणतेही कारण लागू नसताना १९० सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे पप्पू देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांमध्ये जुलै २०२१ मध्ये एक रीट याचिका दाखल केली होती.

चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कंत्राटदारामार्फत भरावयाची १९० सफाई कामगारांची पदे रिक्त आहेत.त्यामुळे जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जुलै २०२१ मध्ये एक रीट याचिका दाखल केली होती.या रीट याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश पृथ्वीराज के.चव्हाण व उर्मिला जोशी- फाळके यांनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संचालक तसेच चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर मागितले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!