Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीदिवाळी सणानिमित्त….'आनंदाचा शिधा' मध्ये मिळणार; १ किलो साखर,१ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी...

दिवाळी सणानिमित्त….’आनंदाचा शिधा’ मध्ये मिळणार; १ किलो साखर,१ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा,चना डाळ,मैदा व पोहे …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,२०१३ अंतर्गत माहे नोव्हेंबर,२०२३ या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू,तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित केले आहे.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका २५ किलो तांदुळ रुपये ३ प्रति किलो प्रमाणे, गहू १० किलो २ रुपये प्रति किलो प्रमाणे तर १ किलो साखर २० रुपये प्रति किलो प्रमाणे.शिधाजिन्नस संच प्रतिसंच रुपये १००/- तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती ३ किलो तांदुळ ३ रुपये प्रति किलो प्रमाणे,२ किलो गहू २ रुपये प्रति किलो प्रमाणे व  शिधाजिन्नस संच प्रतिसंच रुपये १००/- प्रमाणे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,२०१३ अंतर्गत दिनांक- १ जानेवारी,२०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरीता पात्र लाभार्थ्यांना रु.३/- प्रतिकिलो तांदूळ,रु.२/- प्रतिकिलो गहू व रु.१/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना “मोफत” वितरीत करावयाचे शासन निर्देश प्राप्त आहे.

 तसेच शासन पत्र दिनांक-१९ ऑक्टोंबर २०२३ अन्वये जिल्ह्यातील रास्तभाव दुकानामार्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी दिवाळी सणानिमित्त ६ शिधाजीन्निस “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका १ शिधासंच (१ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा,चनाडाळ, मैदा व पोहे अशा ६  शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नसंचाचे माहे नोव्हेंबर २०२३ या महिन्याकरीता ई पॉस प्रणालीव्दारे रु.१००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की,त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्यदुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे नोव्हेंबर,२०२३ या महिन्यातील नियमित देय असलेल्या धान्याची (गहू, व तांदूळ) मोफत उचल करावी.व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावती रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिशिधापत्रिका १ “आनंदाचा शिधा” रु.१००/- प्रतिसंचची उचल करावी.दुकानांत एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे; असे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.    

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!