Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरशेंगा तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या वडील आणि मुलावर चढवला अस्वलाने हल्ला.. -...

शेंगा तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या वडील आणि मुलावर चढवला अस्वलाने हल्ला.. – वडिलांना नागपूरला हलवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना जंगल परिसरात शेतालगत कुड्याच्या झाडाच्या शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलावर अस्वलाने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नागपूरच्या मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले आहे.अरुण कुकसे वय ६६ वर्षे हे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले,तर त्यांचा मुलगा विजय कुकसे हा सुध्धा गंभीर जखमी झाला.
कुड्याच्या झाडाच्या शेंगा तोडण्यासाठी काल शनिवारी अरुण कुकसे व त्यांचा मुलगा विजय कुकसे हे जुनोना जंगल परिसरातील शेतालगत गेले होते. अरुण कुकसे हे शेंगा तोडत असतांनाच अचानकपणे मागून येत अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला.हल्ला चढवताच मुलाने आरडाओरड केली.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत हातात दगड,काठ्या घेऊन अस्वलाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. अश्यातच विजय कुकसे यानेही अस्वलाच्या जवळ जात लाठ्यांनी मारहाण करत असतांनाच हल्ला चढवला.यात अस्वलही जखमी झाली.घटनेची माहिती वन विभागास मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अस्वलीला पुढील उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!