Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजशिवराजपूर,ऊसेगांव,फरी-झरी गावांनी घेतला दारूविक्री बंदीचा ठराव...- दारूविक्री केल्यास शासकीय दाखल्यांपासून राहणार वंचित...

शिवराजपूर,ऊसेगांव,फरी-झरी गावांनी घेतला दारूविक्री बंदीचा ठराव…- दारूविक्री केल्यास शासकीय दाखल्यांपासून राहणार वंचित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- देसाईगंज तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या शिवराजपूर येथील ग्रामंचायत सभागृहात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात दारू विक्री बंदीचा ठराव पारित करून शिवराजपूर,ऊसेगांव,फरी- झरी गावातील अवैध धंदे वाल्यांना तंबी देऊन दारू विक्री केल्यास शासकीय दाखले,शासकीय योजना व दंडात्मक रक्कम आकारून कारवाई करण्यात येणार असल्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला आहे.

गेली कित्येक वर्षांपासून शिवराजपूर व इतर आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये अवैधरीत्या दारू विक्रीचे धंदे फोफावून तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती.दारूमुळे अनेकांची संसारे उध्वस्त होऊन कौटुंबिक कलह वाढीस लागले असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने दारूविक्री बंदी हाच एकमेव उपाय असल्याने शिवराजपूर गट ग्रामपंचायतीतर्फे गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी,युवा वर्ग,गावकरी यांनी मिळून निर्णय घेतला.

सभे प्रसंगी ग्रामपंचायतस्तरीय समितीचे अध्यक्ष सरपंच सुष्मा सयाम,उपसरपंच वाढई,सदस्य झिलपे, मारोती बघमारे,ग्रामसेविका मैंद,पोलिस पाटील दर्वे,दारूबंदी संघटनेचे सर्व युवक,सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

दारूविक्री बंदी करीता मादक द्रव्य समिती गठीत करण्यात आली.सभेत गावातील नागरिकांनी सरपंचांना निवेदन सादर करून दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यावरून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तिन्ही गावांमध्ये अवैध दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला.कोणत्याही नागरिकांनी दारूविक्री केल्यास त्याला शासकीय दाखले योजनांपासून वंचित ठेवण्यात येईल. दारूविक्रेत्यांकडून दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल.तिन्ही गावातील पानठेले व किराणा दुकानांची नोंदणी करण्यात येईल.तसेच दारू पिणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!