Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे "जागरुक पालक, सुदृढ बालक" मोहिमेचा शुभारंभ

गडचिरोली येथे “जागरुक पालक, सुदृढ बालक” मोहिमेचा शुभारंभ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्ह्यामधे “जागरुक पालक,सुदृढ बालक” या मोहिमेचे तसेच ७ आरोग्य संस्थांमध्ये महारक्तदान व ६२ आरोग्य  संस्थांमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

“जागरुक पालक, सुदृढ बालक” या मोहिमेचा शुभारंभ प्रा.डॉ.तानाजी सावंत आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुरदृष्य प्रणालीव्दारे करण्यात आल्यानंतर गडचिरोली जिल्हयामध्ये सदर मोहिमेचे उदघाटन राजेन्द्र भुयार,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे हस्ते स्कुल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथे करण्यात आले.

“जागरुक पालक, सुदृढ बालक” या मोहिमेमध्ये जिल्हयातील ० ते १८ वर्ष वयोगटातील  एकुण २,९२,०५१ मुला-मुलींची संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार असून सदर तपासणी ही जिल्ह्यातील अंगणवाडी केन्द्र व शाळांमध्ये करण्यात येणार असून त्याकरीता जिल्हयामध्ये  वैद्यकिय अधिकारी यांचे ३५४ पथक तयार करण्यात आलेली आहेत. आवश्यक्तेनूसार आरोग्य तपासणी करण्यात आलेल्या मुला-मुलींना पुढिल उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ आरोग्य संस्थांमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. 

सदर मोहिमेमध्ये सर्व पालकांनी आपल्या मुला-मुलींची संपूर्ण आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन डॉ.दावल साळवे,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले. 

सदर कार्यक्रमाकरीता राजेन्द्र भुयार,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली,डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ. संजयकुमार जठार अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ.स्वप्निल बेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली,अर्चना इंगोले उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली, राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी(माध्यमिक), जिल्हा परिषद गडचिरोलीडॉ. सचिन हेमके, सहसंचालक कुष्ठरोग, गडचिरोली, डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकिय अधिकारी, सामान्य रुग्णालय,गडचिरोली, महेन्द्र गणवीर, तहसिलदार, गडचिरोली, डॉ. सुनिल मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली, डॉ. माधुरी किलनाके, वैद्यकिय अधिक्षक, महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली, डॉ. राहुल थिगळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली, आशुतोष लोंढे, प्राचार्य, स्कुल ऑफ स्कॉलर्स, गडचिरोली उपस्थित होते. 

सदर कार्यक्रामाच्या यशस्वीतेसाठी स्कुल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथिल विद्यार्थी व कर्मचारीवृंद तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली व सामान्य रुग्णालय गडचिरोली येथिल आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!