Saturday, October 17, 2026
Homeचंद्रपूरशिक्षकाने पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या..!

शिक्षकाने पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका ४० वर्षीय शिक्षकाने घरी कुणीही नसतांना पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरात उघडकीस आली आहे.विवेक विनोद हरमवार वय ४० वर्षे रा.वॉर्ड क्रमांक-१४ मूल शहर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते मूल तालुक्यातील चांदली बुज गावचे मूळ रहिवासी होते.दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर काल शुक्रवार शाळेचा पहिला दिवस होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी ते गैरहजर असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना फोन केला.वारंवार फोन करूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने  मुख्याध्यापकांनी हरमवार यांच्या पत्नीला फोन केला. पत्नीला फोनवरून विचारणा केली असता त्यांनी माहेरी असल्याचे सांगितले.त्यानंतर पत्नी व नातेवाईकांनी विवेक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही.संपर्क होत नसल्याने पत्नी व नातेवाइकांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे पत्नी व नातेवाइक मूल येथील घरी परतले असता विवेक हरमवार हे घरातील पंख्याला लटकून असल्याचे दिसून आले.लागलीच कुटुंबीयांनी मूल पोलिसांना घटनेची माहिती दिली.मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.घटनेने हरमवार कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.मृतक शिक्षक विवेक हरमवार हे मूल शहराच्या बाल विकास प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर बऱ्याच कालावधीपासून कार्यरत होते.त्यांनी आत्महत्येसारख्या अचानक घेतलेल्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!