Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाकुरखेडाच्या जांभूळखेडा गावात अवैध दारूचा महापूर.. -तरुण पिढी गावठी ब्रँडच्या आहारी..

कुरखेडाच्या जांभूळखेडा गावात अवैध दारूचा महापूर.. -तरुण पिढी गावठी ब्रँडच्या आहारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुका मुख्यालयापासून कोरची मार्गे अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या जांभूळखेडा गावात अवैध दारू विक्रीने अक्षरशः थैमान घातले आहे.गावठी मोहफुलाचा ब्रँड सर्वांचा आवडता पेय झाला असून तरुण पिढी गावठी ब्रँडच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.या गंभीर समस्येकडे पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांकडून केला जातो आहे.
कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावात ना देशी,ना विदेशी,ना बियर ओन्ली फॉर गावठी ब्रँड मिळतो.या छोट्याश्या गावात जवळपास सात ते आठ अवैध दारू विक्रेते उदयास आले असून गावठी ब्रँड स्वस्तात मस्त मिळत असल्याने सकाळ,दुपार,सायंकाळ अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी तळीरामांची रेलचेल सुरू असते. दारूच्या अती सेवनाने गावातील अनेक संसार उघड्यावर आले असून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहेत.त्याचबरोबर दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुण अकाली मृत पावले आहेत.अनेकजण दारूच्या आहारी गेल्याने कुटूंबीय त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे, कुटुंबातील महिला व लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
  • पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह👇
​एकीकडे शासन ‘तंटामुक्त गाव’ आणि ‘नशामुक्त भारत’ सारख्या घोषणा करत असतांना जांभूळखेडा गावात मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती आहे.गावात उघडपणे अवैध दारूची विक्री होत असतांना यावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाकडून अक्ष्यम्य दुर्लक्ष केले जात आहे.यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात प्रशासन कानाडोळा करत असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.​गावातील सुजाण नागरिक तसेच महिला वर्ग यावर त्वरित आळा घालण्याची व कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.गावातील अवैध दारू विक्री  थांबवावी.या बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्यांवर त्वरित कारवाई करावी.तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी.या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कठोर पाऊले उचलावीत; अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!