Monday, August 31, 2026
Homeनागपूरविमानतळावर पाच कोटी रुपयांचे पाच किलो ड्रग्ज जप्त..

विमानतळावर पाच कोटी रुपयांचे पाच किलो ड्रग्ज जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कतार एअरवेजच्या दोहा-नागपूर फ्लाइट क्रमांक- क्यूआर ५९० मधून आलेल्या एका प्रवाशाजवळ तब्बल पाच कोटी रुपयांचे पाच किलो ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ प्रतिबंधित ड्रग्ज नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली.सदरची कारवाई डीआरआय(डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स)आणि कस्टम्सच्या विशेष इंटेलिजन्स व एसआयआयबी(इव्हेस्टिगेटिव्ह ब्रँचने)संयुक्तरीत्या केली असून डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विमानतळावर एका प्रवाशाची सखोल तपासणी करण्यात आली.तपासणीत त्याच्या बॅगेतून सुमारे पाच किलो ड्रग्ज आढळले.याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे.
आरोपीने ड्रग्जची खेप ही थायलंडची राजधानी बँकॉक येथून घेतली होती.त्यानंतर तो उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद,तेथून दोहा आणि शेवटी नागपूर येथे आला. पकडण्यात आलेले ड्रग्ज चरस,गांजा आणि भांगपेक्षा अधिक प्रभावी असून त्याचा मानवी मेंदूवर झपाट्याने परिणाम होतो.हे ड्रग्ज प्रामुख्याने आग्नेय आशियाई देशांत तयार केले जाते. रेव्ह पार्टीत ‘हाय-क्लास ड्रग्ज’ म्हणून या पदार्थाला मोठी मागणी असते.या घटकात ‘टेट्राहायड्रोकॅनाबिनोल'(टीएचसी)चे प्रमाण साध्या गांजापेक्षा अधिक असल्याने नशेचे सेवन करणारे यास अधिक पसंती देतात.हायड्रोपोनिक शेती म्हणजे मातीऐवजी पाण्यात पोषकतत्त्वे देऊन झाडे वाढविण्याची आधुनिक पद्धती.या तंत्रात उगवलेले ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ साध्या गांजापेक्षा अधिक तीव्र आणि जलद नशा देणारे असते.त्यात टेट्राहायड्रोकॅनाबिनोल चे प्रमाण जास्त असल्याने मेंदूवर थेट परिणाम होतो.त्यामुळे हे ड्रग्ज अत्यंत धोकादायक आणि व्यसनकारक मानले जाते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!