Thursday, August 6, 2026
Homeभंडाराशासकीय जागेवर अतिक्रमण करणे सरपंचास भोवले; सरपंच पदमुक्त..

शासकीय जागेवर अतिक्रमण करणे सरपंचास भोवले; सरपंच पदमुक्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शासकीय जागेवर अतिक्रमण करणे सरपंचास भोवले आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण करीत घराचे बांधकाम केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बपेरा येथील सरपंच यादवराव लालाजी बोरकर यांना जिल्हाधिकाऱ्यांचा ५ मार्च २०२४ रोजी दिलेला आदेश कायम ठेवत नागपूर विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्तांनी पदमुक्त केले आहे.
अधिक माहिती अशी की,बपेरा गावात असणाऱ्या गट क्रमांक ५५६ मधील जागा आठवडी बाजार,झुडपी जंगलाकरिता नोंद करण्यात आली आहे.या गटातील ६०० चौरस फूट जागेत सरपंच यादवराव लालाजी बोरकर यांनी घराचे पक्के बांधकाम केले आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे सरपंच यादवराव बोरकर यांना सरपंच पदावरून पदमुक्त करण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते व्यंकट राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रकरण दाखल केले होते.या प्रकरणात सुनावणी घेत असतांना संबंधित प्रकरणातील सर्व पुरावे तपासले गेले.चौकशीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा कलम १४ (३) नुसार सरपंच यादवराव बोरकर यांना पदमुक्त करण्यात येत असल्याची कारवाई केली.यासंदर्भात ५ मार्च २०२४ ला पदमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय दिला.या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सरपंच यादवराव बोरकर यांनी अपर आयुक्त नागपूर यांच्या दालनात सादर केले.अप्पर आयुक्तांनी सुनावणी घेत जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला असून,अपिलार्थी सरपंच यादवराव बोरकर यांची अपिल फेटाळण्यात आली. सरपंच पदावरून पदमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दिलेला आहे.जिल्हाधिकारी आणि अपर आयुक्त यांनी दिलेल्या निर्णयाने सरपंच पदमुक्त झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!