Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोली१५ वा राष्ट्रीय मतदार दिन येत्या २५ जानेवारीला विविध उपक्रमांनी होणार साजरा...

१५ वा राष्ट्रीय मतदार दिन येत्या २५ जानेवारीला विविध उपक्रमांनी होणार साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- २५ जानेवारी हा भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असून यावर्षी २५ जानेवारी २०२५ ला १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.निवडणूक विषयक जागृती निर्माण करण्याकरीता चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले असुन शाळा,महाविद्यालय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा गुणक्रमे पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे कार्यक्रमात करण्यात येणार आहे.मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व त्यांच्यात मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे दिनांक-२५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.
१५ व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी  ‘Nothing like voting,I Vote for sure’ हा विषय (Theme)  आयोगाकडून देण्यात आलेला आहे.राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांना मतदानाबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.असे गडचिरोली उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!