Thursday, September 3, 2026
Homeभंडारावादळी वाऱ्यासह पाऊस; ५० फूट उंच बुद्ध मूर्ती कोसळली..

वादळी वाऱ्यासह पाऊस; ५० फूट उंच बुद्ध मूर्ती कोसळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात आज,मंगळवार १० जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.विशेष करून पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात वादळाने नागरिकांची तारांबळ उडाली होती.वादळी वाऱ्यामुळे भेंडाळा,खैरी,दिवाण, मोखारा,वडेगाव येथे घरांवरील टिनपत्रे आणि छत उडाले.अश्यातच चंद्रमणी विहार समितीने अथक परिश्रम आणि बौद्ध उपासकांच्या सहकार्याने पवनी शहरात ४५ ते ५० फूट उंच भव्य बौद्ध मूर्तीची स्थापना केली होती.मात्र,आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यामुळे गौतम बुद्धांची भव्य-दिव्य अशी मूर्ती कोसळली.त्यातच वादळीवाऱ्यामुळे मुख्य रस्त्यांवर झाडे कोसळल्याने पवनी-लाखांदूर मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.चंद्रपूर जिल्ह्यालाही वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.चंद्रपूरात आज मंगळवारी सायंकाळी पाऊस झाला.वादळी पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली.ताडोबा मार्गावरील पदमापूर-मोहरली रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती.त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!