Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीराज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. - देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्याचा तबादला..

राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. – देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्याचा तबादला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यात बऱ्याच महिन्यांपासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सुर असतांनाच पुन्हा एकदा आज,मंगळवार १० जून रोजी राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज उपविभागीय अधिकारी (SDM) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी श्रीमती मानसी यांची लातूर महानगरपालिका या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त देण्यात आली आहे.तर श्रीमती.मिन्नू पी.एम.यांची मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१.नितीन पाटील (IAS २००७) आयुक्त,कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता,नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२.ए.बी.धुळज (IAS २००९)महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ,मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक यांना मंत्रालय,मुंबई येथील ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३.लहू माळी (IAS २००९) व्यवस्थापकीय संचालक,महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ,मुंबई यांना आयुक्त,कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता,नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
४.बाबासाहेब बेलदार (IAS २०१५) छत्रपती संभाजी नगर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त यांची मुंबई येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५.मुरुगनंथम एम.(IAS २०२०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६.आदित्य जीवाने (IAS २०२१) मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक,महाडीस्कॉम,छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली.
७.श्रीमती.मिन्नू पी.एम. (IAS २०२१) सहाय्यक जिल्हाधिकारी,भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८.श्रीमती.मानसी (IAS २०२१) सहाय्यक जिल्हाधिकारी,देसाईगंज उपविभाग,गडचिरोली यांची महापालिका आयुक्त,लातूर महानगरपालिका,लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!