Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीपर्यावरणाची ऐशी-तैशी.! गडचिरोली जिल्ह्यावर मोठा आघात; २ हजार २५० एकरवरील झाडांची...

पर्यावरणाची ऐशी-तैशी.! गडचिरोली जिल्ह्यावर मोठा आघात; २ हजार २५० एकरवरील झाडांची होणार कत्तल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एकीकडे वृक्ष लागवडीच्या नावावर मोठा गाजावाजा केला जातो,तर दुसरीकडे पर्यावरणाची ऐशी-तैशी केली जाणार असल्याचा प्रकार नुकताच गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस येऊ लागला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज शुद्धीकरण प्रकल्पासाठी लॉयड्स कंपनीला गडचिरोलीतील तब्बल ९०० हेक्टर जंगलावर कुऱ्हाड चालवण्यास आणि एक लाखाहून अधिक झाडांची कत्तल करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याचे वृत्त ‘दैनिक सामना’ ने प्रसारित केले आहे.
दिलेल्या वृत्तानुसार,केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीसाठी सुरजागडच्या खाणीतील लोहखनिजाचे उत्पादन दुपटीने अधिक करण्याची शिफारस केली आहे.सध्या लोहखनिजाचे उत्पादन वार्षिक १० दशलक्ष टन इतके असून ते वार्षिक २६ दशलक्ष टनवर नेण्याची शिफारस तज्ञांच्या समितीने केली आहे.याच प्रकल्पासाठी केंद्र सरकारने लॉयड्स कंपनीला ९०० हेक्टर म्हणजेच तब्बल २ हजार २५० एकरवरील जंगलाची वाट लावण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जमीन,जंगले आणि नद्या आदिवासी समुदायाच्या जीवनाचा आधार आहेत.ही नैसर्गिक संसाधने स्टील उत्पादनाच्या नावाखाली नष्ट केली जात आहेत.यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण होण्याबरोबरच आदिवासी समाजाचे विस्थापन होईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!