Tuesday, July 28, 2026
Homeदेसाईगंजवर्ष लोटून गेला तरी चालेल पण आंदोलन मागे हटणार नाही..! - ४५...

वर्ष लोटून गेला तरी चालेल पण आंदोलन मागे हटणार नाही..! – ४५ दिवसानंतरही आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम.. – देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा-मेंढा अवैध वाळू उपसा प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा वैनगंगा नदी घाटातून कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळूचा उपसा करण्यात आला.अवैध वाळूचा उपसा सुरू असतांना याबाबत गावातील सुजाण नागरिक तथा ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करून देसाईगंज महसूल प्रशासनास माहिती देण्यात आली.मात्र,माहिती देऊनही देसाईगंज महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल वा कार्यवाही करण्यात आली नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला.कोंढाळा-मेंढा रेतीघाटामध्ये जवळपास २ किलोमिटर वर्तुळाकार अंतर जमिनीपासून ५ फुटाच्यावर हजारो ब्रास वाळूचे अवैधरित्या उत्खनन करण्यात आले आहे.देसाईगंज महसूल प्रशासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही तसेच दखल घेत नसल्याप्रकरणी दिनांक-३० डिसेंबर २०२४ पासून गावातील नामदेव वसाके व सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.त्यानुसार सदर आंदोलनास ४५ दिवसांचा कालावधी लोटलेला आहे.या कालावधीत तीन मागण्यांपैकी दोन मागण्या पूर्ण करून एक मागणी प्रलंबित असल्याने ४५ दिवसानंतरही आंदोलनकर्ते बेमुदत ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.अशातच आंदोलनकर्त्यांनी
वर्ष लोटून गेला तरी चालेल,पण मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही; अशी ठोस भूमिका घेतली आहे.
आंदोलन सार्वजनिक हिताचा👇
महत्वाचे म्हणजे,पुकारण्यात आलेला आंदोलन हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून सार्वजनिक हिताचा आहे.त्यामुळे क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी मुद्दा उचलून धरणे आवश्यक आहे.मात्र,या ठिकाणी वेगळीच परिस्थिती पहावयास मिळून येत आहे.
              चर्चेतील विषय👇
चर्चेतील विषयामध्ये,अनेकांचे खिसे गरम झाल्याने अनेकजण चुप्पी साधून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावू लागले असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाळू चोरट्यांना केवळ कोंढाळा गावातील परिसरच दिसून येतो काय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!