Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीजंगली हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली.. - जंगली हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्राच्या...

जंगली हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली.. – जंगली हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्राच्या वसा-चुरमुरा जंगल परिसरात ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वडसा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या पोर्ला वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या नवरगाव जंगल परिसरासह अगदी गावशेजारी जंगली हत्तींचा कळप मंगळवार ११ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान आढळून आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.सायंकाळच्या सुमारास पोर्ला वरून नवरगावला जाणाऱ्या एका व्यक्तीला  जंगली हत्तींचा कळप गावशेजारी जातांना दिसून आला.त्यामुळे सदर व्यक्तीने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली.गावकऱ्यांनी जंगली हत्तींना पळविण्यासाठी फटाके फोडून पळविण्याचा प्रयत्न केला.त्यातच जंगली हत्तींनी भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.अशातच आता हत्तींचा कळप काल शनिवारी पोर्ला वनपरिक्षेत्राच्या वसा-चुरमुरा परिसराच्या जंगलात दिसून आला.सहा दिवसांपूर्वी हाच कळप याच भागात आलेला होता. सध्या पोर्ला वनपरिक्षेत्राच्या परिसरातील भागात शेतकऱ्यांनी मका उन्हाळी धान पिकाची लागवड केलेली आहे.मका पीक कणसावर आहे,तर धान पीक सुद्धा जोमात वाढलेले आहे.त्यामुळे जंगली हत्तींच्या आगमनाने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.पिकांवर जंगली हत्तींच्या कळपाची वक्रदृष्टी पडल्यास पीक नेस्तनाबूत होऊन केलेल्या मेहनतीवर पाणी पडल्याशिवाय राहणार नाही.अशातच जंगली हत्तींच्या कळपामुळे कुठल्याही प्रकारची मानवी हानी होऊ नये,यासाठी वनविभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.याशिवाय हुल्ला टीम हत्तींच्या मागावर असून स्थानिक कर्मचाऱ्यांची चमू देखरेख ठेवत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!