Sunday, August 30, 2026
Homeभंडारावनपरिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी..

वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अड्याळ येथील वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे हे वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून निलंबनाची धमकी देत असल्याची तक्रार दिल्याननंतर उपवनसंरक्षकांनी सखोल चौकशी करीत कारवाई करावी; या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल,वन कर्मचारी संघटनेच्या वतीने भंडाऱ्यातील वन कार्यालयात आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील व संघटक ललीतकुमार उचिबगले यांनी केले.यावेळी वनपाल वनरक्षक व वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनानंतर डीएफओंशी यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अड्याळाचे आरएफओ घनश्याम ठोंबरे हे अड्याळ परिक्षेत्रात रुजू झाल्यापासून त्यांचे वन कर्मचाऱ्यांशी वागणूक असभ्य असल्याचा आरोप आहे.शिवीगाळ करणे,धमकी देणे व निलंबनाची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.१० ऑगस्ट २०२४ ला बिटरक्षक एन.पी.पारधी यांनी घटनेची माहिती देण्यासंदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी ठोंबरे यांना फोन केला असता, ‘सकाळी फोन का केला,माझी झोपमोड केली,असे बोलून शिवीगाळ केली.तसेच जुने प्रकरण काढून निलंबित करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.ठोंबरे हे क्षेत्रातील एक दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून इतर कर्मचाऱ्यांवर दहशत घालून हेतू पुरस्पर वागणूक करीत असल्याचे निवेदनात आरोप करण्यात आला आहे.
क्षेत्र सहाय्यक शामकुवर व इतर वनरक्षकांना ग्रामस्थांच्या समक्ष शिवीगाळ केल्याचे व निलंबित करण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत नमूद आहे. यासह अन्य मागण्यांना घेऊन केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील व केंद्रीय संघटक ललितकुमार उचीबगले यांच्या नेतृत्वात उपवनसंरक्षकांना भेट घेत चर्चा करण्यात आली.या सर्व सर्वच प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!