उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- रानटी हत्तीच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यात गत दोन-तीन वर्षांपासून ठाण मांडले आहे.देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव येथील सहा शेतकऱ्यांच्या शेतात दोन दिवांपूर्वी पहाटेच्या सुमारास हत्तीच्या कळपाने धुडघूस घालून धान पिकासह इतर साहित्याची नासधूस केली.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हत्तींच्या कळपाने धान पिकात शिरून उभे धानपीक जमिनीत गाडले तर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली पाइपलाइनही फोडली. कुंपण केलेले तार तोडल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव, चिखली, विहिरगाव, शिवराजपुर या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हत्तीच्या कळपाचे वास्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी व इत्तर पिकांचे हत्तींकडून नुक नुकसान केले जात आहे.हत्तींच्या भीतीपोटी शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव येथील पुरुषोत्तम गेडाम, अरुण गुरनुले, सुखदेव शंभरकर, परमेश पिलावान, अनिल गेडाम, शेषराव बलथरे या शेतकऱ्यांच्या शेतात दोन दिवांपूर्वी पहाटेच्या सुमारास हत्तीच्या कळपाने शेतात शिरून उभे धानपीक जमीनदोस्त केले असल्याने यावर त्वरित वनविभागाने आळा घालावा; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

