उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पूर ओसरला माती झाली मात्र अजूनही प्रशासनास जागच नाही आली?शेतकरी बांधव अस्मानी संकट झेलून कर्जाच्या बोजात अडकला तरीही प्रशासनास जाग येणार तरी कधी? असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जातो आहे.सप्टेंबर २०२३ मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन पिके पाण्याखाली गेली.त्यानंतर पुन्हा ऑक्टोंबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.मात्र, झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.ही भरपाई त्वरित देण्यात यावी; या मागणीसाठी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मार्गदर्शनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले.२०२३-२४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीठ तसेच पिकांवरील रोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. देसाईगंज तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला होता.हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.पंचनामे करून स्थानिक तलाठ्यांमार्फत अहवाल पाठविण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना सहा महिने लोटूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह चालवितो.परंतु, शेतकऱ्यांचे तीनदा नुकसान होवूनही अजूनपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही.तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचा मोबदला येत्या १५ दिवसांत देण्यात यावा; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल; असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष छगन सेडमाके,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय करनकर, उपाध्यक्षा ममता पेंदाम, सचिव जगदीश शेंद्रे,महेंद्र खरकाटे, टिकाराम सहारे, माजी युवक काँग्रेस शहरध्यक्ष पिंकू बावणे, भूमेश्वर सिंगाडे, धर्मेंद्र लाडे, चैतनदास चंदनबटवे, ताबेश्वर ढोरे, राजेंद्र तुपटे, लिलाधर भरें, हरिदास बगमारे, सुरेश तोंडफोडे, ऋषी बगमारे, सुरेश मेश्राम, प्रमोद दोनाडकर, लक्ष्मन मेश्राम, पद्माकर राऊत, अमर बगमारे, धनु मोहुर्ले, खेमराज पर्वतकार, महेश अवसरे, रेखा वरखडे, प्रांजली दुपारे व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

