Friday, October 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तधान्य वितरणातील अडचणी होणार कमी-डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारेही मिळणार रेशनचे धान्य…..

धान्य वितरणातील अडचणी होणार कमी-डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारेही मिळणार रेशनचे धान्य…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारेही आता रेशनवरील धान्य मिळणार आहे.’आयरिस’ स्कॅनरची सुविधा असलेली ई-पॉस मशिन आता धान्य दुकानदारांना दिली जाणार आहे.यामुळे धान्य वितरणातील अडचणी कमी होणार आहेत.अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना रेशनवरून मोफत धान्य दिले जाते.या धान्याचे वितरण ई-पॉस मशिनद्वारे होते.लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे या ई-पॉस मशिनवरून घेऊन त्याची ओळख पटवली जाते.त्यानंतरच धान्याचे वितरण होते. कष्टकरी,दिव्यांग,वयोवृद्ध तसेच कुष्ठरुग्णांना हाताचे ठसे योग्य पद्धतीने उमटत नसल्याने त्याचा मोठा फटका बसत होता.दहा वर्षांपूर्वी आधार नोंदणी झालेली असल्याने अनेकदा काहींच्या हाताचे ठसे जुळत नसल्याने धान्य वितरणात अडचणी येत होत्या. यावरून दुकानदार आणि नागरिकांत वादावादीचे प्रसंग अनेकदा घडत आहेत.हे ई-पॉस मशिन बदलून द्यावे, अशी मागणी धान्य दुकानदारांकडून सातत्याने होत होती.या सर्व पार्श्वमीवर राज्य शासनाने आता सर्वच दुकानदारांना आयरिस प्रणालीसह ई-पॉस मशिन दिली जाणार आहेत.यामुळे नागरिकांच्या हाताचे ठसे जुळले नाहीत अथवा त्यात अडचणी आल्या,तरी डोळ्यांचे स्कॅनिंग करून त्यांची खात्री केली जाईल आणि धान्य वितरण होईल.लवकरच सर्व दुकानदारांकडे या नव्या सुविधेसह ई-पॉस मशिन कार्यरत होतील,असे नियोजन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!