Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंज'यांना' म्हणतात जन सामांन्यांचा खरा नेता; पावसामुळे रस्ते बंद; वाहन ठेवले ब्रम्हपुरीत.....

‘यांना’ म्हणतात जन सामांन्यांचा खरा नेता; पावसामुळे रस्ते बंद; वाहन ठेवले ब्रम्हपुरीत.. – आमदार पदाचा आविर्भाव मनी न बाळगता चक्क लोकल ट्रेनने प्रवास करून पोहचले शेतबांधावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आम्ही उगीचच कुणाचे गुणगान गात नाही.जो सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी बांधवांचे प्रश्न विधानसभेच्या भर सभागृहात ठणकावून मांडतोय आणि विदर्भात हाहाकार माजविलेल्या पावसामुळे आपल्या विधानसभा क्षेत्रातील शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांची झालेली दयनीय अवस्था पाहण्यासाठी व त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मुंबईत सुरू असलेले विधिमंडळ अधिवेशन सोडून पावसामुळे रस्ते बंद असतांना आमदार पदाचा आविर्भाव मनी न बाळगता सर्वसामान्यांसह चक्क लोकल ट्रेनने प्रवास करून सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतोय,यांनाच म्हणतात जन सामान्यांचा खरा नेता.असा खरा नेता आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ‘आमदार रामदास मसराम’ होय.
सध्या स्थितीत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन  मुंबई येथे सुरू आहे.पावसाळी अधिवेशन १८ जुलै पर्यंत चालणार आहे.राज्यातील सर्व आमदार मुंबईत आहेत.अधिवेशन सुरू असतांनाच गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घालून संपूर्ण जनजीवन विस्कळित केले.नदी- नाले ओसंडून वाहू लागलेत.पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने मार्गही बंद पडलेत.अश्यातच जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेला शेतकऱ्यांच्या भेटी करीता आज आमदार रामदास मसराम निघाले होते.मात्र, जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हात प्रवेश करणारे सर्व रस्ते वैनगंगा नदीच्या पुरामुळे बंद असल्याने त्यांनी ब्रम्हपुरी येथे आपले वाहन सोडत ब्रम्हपुरीचे रेल्वे स्टेशन गाठले आणि बल्लारशाह-गोंदिया या लोकल ट्रेनमध्ये स्वार होत आज,गुरुवार १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता मतदार संघातील देसाईगंज शहर गाठत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.यावेळी जिल्हात तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने पूर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली सापडल्याने पिकांचे अतोनात नूकसान होत आहे.शेतकरी अडचणीत आलेला आहे.त्यामुळे या नुकसानीचा आढावा घेण्याकरीता तसेच शासनाकडे याबाबत आवश्यक पाठपुरावा करण्याकरीता व त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याकरीता व परीस्थीती समजून घेण्याकरीता आज रस्ते बंद असतांनाही कोणताही बडेजाव न करता लोकल ट्रेनने प्रवास करीत आमदार मसराम यांनी मतदार संघ गाठले.यावेळी त्यांनी सर्वसामान्य ट्रेन मधील प्रवाशांशी सुद्धा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी व पूर परीस्थीतीची माहीती जाणून घेतली.रामदास मसराम यांनी आमदार पदाचा आविर्भाव मनी न बाळगता सर्वसामान्यांत एकरूप होण्याच्या कृतीचे सर्वसामान्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!