Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरमावशीकडे गेलेल्या तरुणाची हत्या; तीन आरोपी अटकेत..

मावशीकडे गेलेल्या तरुणाची हत्या; तीन आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहरात वास्तव्यास असणाऱ्या 
मावशीकडे गेलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा दुसऱ्या दिवशी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.सदरची घटना आज,रविवार ४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास चिमूर शहरात उघडकीस आली होती.आकाश प्रभाकर उताने वय ३१ वर्षे,रा.तनस कॉलनी,ठक्कर वॉर्ड, चिमूर,जि.चंद्रपूर असे मृतक तरुणाचे नाव असून तो काल शनिवारी शहरातील मावशीकडे गेला होता.प्रकरणी मृतकाची आई उषा प्रभाकर उताने वय ५० वर्षे यांनी आज चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.चिमूर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता.लागलीच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आकाश उताने हा काल शनिवार ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घरून निघाला होता.त्यानंतर,तो दुपारी शहरातील त्याची मावशी आशा प्रभु निखाडे रा.मिसार कॉलनी,नेताजी वार्ड,चिमूर यांच्या घरी गेला.तिथे त्याने जेवण केले आणि निघून गेला.त्यानंतर तो कुठे गेला, याची कल्पना कुणालाही आली नाही.विशेष म्हणजे, आकाश हा नेहमी रात्री उशिरा घरी जात असल्याने तो मावशीकडेच थांबला असावा,असे कुटुंबीयांना वाटले. अश्यातच आज रविवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास मुतकाची मावशी आशा निखाडे यांचे पती प्रभु निखाडे यांनी आकाश हा शहरातील नेहरू शाळेच्या मागील बाजूस मृतावस्थेत पडल्याची माहिती मृतकाची आई उषा उताने यांना दिली. लागलीच घटनेची माहिती मिळताच त्यांनी  घटनास्थळी धाव घेतली असता आकाश हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला.त्याच्या डोक्यावर,चेहऱ्यावर व इतर ठिकाणी गंभीर जखमा असल्याचे दिसून आले.त्याचबरोबर घटनास्थळी रक्ताचे डाग असलेला दगड आढळून आल्याने अज्ञात इसमाने आकाशला मारहाण करून त्याची हत्या केली असावी,असा संशय व्यक्त करण्यात आला होता.प्रकरणी चिमूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्या दिशेने तपास सुरू केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व चिमूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.या पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या तीन तासांत गुन्ह्यातील आरोपी सुजल विलास सोनवाने वय २० वर्षे,छगण मोहन दिगोरे वय २७ वर्षे व अनिकेत शेषराव साखरकर वय २४ वर्षे,तिघेही रा.नेताजी वार्ड,चिमूर,यांना अटक केली आहे.घटनेच्या वेळी आकाश हा दारूच्या नशेत होता.दारूच्या नशेत त्याने आरोपींना शिवीगाळ केली,यातून वाद झाला.वाद विकोपाला गेला आणि तिघांनी मिळून आकाशची हत्या केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून,आरोपींना उद्या सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!