Monday, August 31, 2026
Homeगोंदियारानगव्याने शेतकऱ्याच्या पोटात खुपसली शिंगे; शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू..

रानगव्याने शेतकऱ्याच्या पोटात खुपसली शिंगे; शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-सकाळच्या सुमारास शेताकडे निघालेल्या वाटेत अचानकपणे समोर आलेल्या रानगव्याने शेतकऱ्याच्या पोटात शिंगे खुपसल्याने शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव-शहारवाणी मार्गावरील शेतशिवार परिसरात घडली.नीलकंठ नंदलाल तुरकर वय ५७ वर्षे,रा.सोनेगाव, ता.गोरेगाव,जि.गोंदिया असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार,नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनला लागूनच गोरेगाव तालुका आहे.त्यामुळे परिसरातील हिंस्त्र प्राणी वा इतर वन्य प्राण्यांचे नागरिकांना नेहमीच दर्शन होत असते.अश्यातच आज रविवारी सकाळच्या सुमारास सोनेगाव येथील शेतकरी नीलकंठ तुरकर हे गावातील चौकात काहीकाळ गप्पा मारून शेताकडे निघाले होते.दरम्यान,शेतशिवारातील जंगल परिसरातून एक विशालकाय रानगवा अचानकपणे नीलकंठ यांच्यासमोर उभा झाला आणि थेट पोटात शिंगे खुपसली.यात रक्तबंबाळ झालेले शेतकरी नीलकंठ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदरची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली आणि संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.रानगवा दिसताच  गावकऱ्यांनी रानगव्याला तिथून पिटाळून लावले.रानगवा एवढ्यावरच थांबला नाही,तर सोनेगाव येथून पळाल्यानंतर त्याने कवलेवाडा आणि चिचगावटोला परिसरात शिरकाव केला.प्रसंगी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करीत रानगव्याला हुसकावून लावले.अचानक घडलेल्या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!