Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरदेवीचे दर्शन घेत मुख्यमंत्र्यांनी फोडला चंद्रपूर मनपाच्या प्रचाराचा नारळ.

देवीचे दर्शन घेत मुख्यमंत्र्यांनी फोडला चंद्रपूर मनपाच्या प्रचाराचा नारळ.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यातील २९ महानगरपालिकांंच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी काल,शनिवार ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून राज्यात तब्बल १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत.तर १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत २ हजार ८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.चंद्रपूर शहर महानगरपालिकेत एकूण १७ प्रभाग असून ६६  सदस्य संख्या असलेल्या पालिकेत तब्बल ४५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.अश्यातच आज,रविवार ४ जानेवारीला
राज्यभरात सर्वच महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे.यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य विजय संकल्प यात्रा काढण्यात आली.अंचलेश्वर गेट येथून निघालेल्या संकल्प यात्रेचा जटपूरा गेट येथे समारोप करण्यात आला.प्रसंगी चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला.यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ.प्रा.अशोक उईके,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगळे,आमदार करण देवतळे, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव,जिल्हाप्रमुख ॲड.युवराज धानोरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जात आहे.चंद्रपूर शहरात मागील काही काळात हंसराज अहिर,सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात विकास झाला आहे. चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत विविध विकासकामे झाली असून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जनउपयोगी योजना आम्ही येथे यशस्वीपणे राबवित आहोत.आता १६ हजार घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा निर्णय झाला असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आजच्या या विजय संकल्प यात्रेतून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि माता महाकालीच्या दर्शनाने चंद्रपूर महानगरपालिकेत महाविजय मिळणार असून येथे महायुतीचा झेंडा फडकेल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.प्रसंगी अंचलेश्वर गेटजवळून निघालेल्या विजय संकल्प यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!