Tuesday, July 7, 2026
Homeचंद्रपूर“माझ्या लेकीला वाचवा हो…!” मृत्यूशी झुंज देणाऱ्या १२ वर्षीय सनाया मेश्रामसाठी एका...

“माझ्या लेकीला वाचवा हो…!” मृत्यूशी झुंज देणाऱ्या १२ वर्षीय सनाया मेश्रामसाठी एका गरीब वडिलांची समाजाला आर्त हाक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील गडीसुर्ला गावात आज एक माणुसकीला चटका लावणारी वेदनादायक घटना उघडकीस आली आहे.ज्या वयात शाळेच्या दप्तरासोबत मोठी स्वप्ने रंगवायची असतात, खेळायचे, हसायचे आणि आई-वडिलांच्या कुशीत निर्धास्तपणे जगायचे असते; त्या वयात अवघ्या १२ वर्षांची सनाया चरणदास मेश्राम आज रुग्णालयाच्या बेडवर मृत्यूशी झुंज देत आहे.सनाया एका अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी.आई-वडील रोज मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढतात.कधी काम मिळते,तर कधी मिळतच नाही.अश्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.काही दिवसांपूर्वी सनायाला पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला साधा त्रास समजून गावातच उपचार करण्यात आले.पण,वेदना वाढतच गेल्या.आईच्या डोळ्यांत चिंता वाढत गेली आणि वडिलांच्या मनात भीती घर करू लागली.शेवटी आई-वडिलांनी तिला मोठ्या दवाखान्यात भरती केले.अनेक तपासण्या झाल्या आणि रिपोर्ट आले,डॉक्टरांनी सांगितलेले सत्य ऐकून त्या गरीब आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. सनायाचे तब्बल ८० टक्के लिव्हर खराब झाले आहे. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले,तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट झाले नाही,तर सनायाचा जीव धोक्यात येऊ शकतो.हे शब्द ऐकताच आईचा बांध फुटला.वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.कारण एका बाजूला लेकीचा जीव,तर दुसऱ्या बाजूला पैशांची प्रचंड अडचण उभी होती.लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी तब्बल २८ ते ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.रोजंदारीवर काम करणाऱ्या एका गरीब बापासाठी ही रक्कम म्हणजे आभाळाएवढी मोठी.आज तोच बाप प्रत्येकाच्या दारात हात जोडून उभा आहे.त्याची एकच विनंती आहे;  “माझ्या लेकीला वाचवा हो.! माझ्याकडे पैसा नाही,पण माझी लेक मला जिवापेक्षा जास्त प्रिय आहे…!”
स्वतः चे लिव्हर देऊन लेकीला वाचवण्याची बापाची धडपड👇
सनायाचे वडील स्वतः चे लिव्हर दान करण्यास तयार झाले आहेत.एका बापाचे आपल्या लेकरावर किती निस्सीम प्रेम असत,याचे हे जिवंत उदाहरण आहे.तो स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लेकीला नवजीवन देण्याचा प्रयत्न करत आहे.पण,दुर्दैवाने नियती येऊन पैशांवर थांबली आहे.एका आईची रात्र रात्र रडण्यात जात आहे.एका बापाच्या डोळ्यांत असहाय्यता आणि वेदना भरल्या आहेत आणि एका निष्पाप चिमुकलीचे आयुष्य पैशाअभावी थांबण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.आज जर आपण सर्वांनी मिळून थोडीशी मदत केली,तर एका निष्पाप मुलीला नवजीवन मिळू शकते.आपण प्रत्येकाने फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मदत केली,तरी लाखोंची रक्कम सहज उभी राहू शकते.ही केवळ आर्थिक मदत नाही,तर एका बापाच्या आशा वाचवण्याचा प्रयत्न आहे.एका आईच्या कुशीत तिची मुलगी कायम राहावी यासाठीचा आधार आहे आणि एका चिमुकलीला नवजीवन देण्याचा मानवी धर्म आहे.
मदतीसाठी संपर्क:  80552 89915
सनायाचे सर्व मेडिकल रिपोर्ट उपलब्ध असून माहिती सत्य आहे.
कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.
आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप,फेसबुक,इंस्टाग्राम आणि इतर सर्व सोशल मीडियावर पोहोचवा.कदाचित तुमच्या एका शेअरमुळे,एका छोट्याशा मदतीमुळे,
एका निरागस लेकीचे प्राण वाचू शकतात.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा…” “माणुसकी अजून जिवंत आहे हे कृतीतून दाखवूया…”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!