Sunday, October 4, 2026
Homeभंडारामहिला ग्रामसेविकेच्या धावत्या दुचाकीवर माकडाने मारली उडी; तोल जाऊन गंभीर जखमी…

महिला ग्रामसेविकेच्या धावत्या दुचाकीवर माकडाने मारली उडी; तोल जाऊन गंभीर जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

तुमसर(भंडारा) :- तुमसर-देव्हाडी मार्गे सुकळी (दे.) येथे कर्तव्यावर जाणाऱ्या महिला ग्रामसेविकेच्या धावत्या दुचाकीवर माकडाने झाडावरून उडी घेतली. परिणामी तोल गेल्यामुळे रस्त्यावर पडून ग्रामसेविका गंभीर जखमी झाल्या.आसमा रगडे वय ३२ रा.तुमसर असे त्यांचे नाव आहे.ही घटना फादर ऐग्नल शाळेजवळ सकाळी ११ वाजता घडली.त्यांना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आसमा रगडे या सुकळी (दे.) ग्रामपंचायतीत ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने सकाळी ११ वाजता तुमसर देव्हाडीमार्गे सुकळी येथे कर्तव्यावर निघाल्या होत्या.दरम्यान,अचानकपणे त्यांच्या धावत्या दुचाकीवर माकडाने झाडावरून उडी मारली.अकस्मात बसलेल्या धक्क्याने तोल जावून त्या रस्त्यावरच वाहनासह पडल्या.यात त्या गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येथील डॉक्टरांनी नागपूर येथील रुग्णालयात रेफर केले.सध्या त्यांच्यावर नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली आहे.या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!