Monday, October 5, 2026
Homeनागपूरसावधान….! चक्क पाकीटबंद कुल्फीतून किडे तर इडलीतून निघाला  केस…. 

सावधान….! चक्क पाकीटबंद कुल्फीतून किडे तर इडलीतून निघाला  केस…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- सध्या नागपूर शहरात इडली,अप्पे, ढोकल्याचा गृहउद्योग जोमात असून प्रत्येक दुकानांत हे खाद्य पदार्थ दिसून येत आहे.परंतु या पाकीटबंद पदार्थात केसही येत असल्याने या गृहउद्योगातील निष्काळजीपणा एखाद्याला भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.एवढेच नव्हे तर एका मोठ्या कंपनीच्या पाकीटबंद कुल्फीतून किडे निघाल्याने दिलेल्या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तो क्रमांकही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे गृहउद्योग व मोठ्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विषबाधा होऊन आरोग्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.अनेक दुकानांमध्ये आता दर्शनी भागामध्येच इडली,अप्पे, ढोकला,कोंब आलेली मोट,चणे,मुंगच नव्हे तर लसून,अद्रकचा पेस्ट आदी पाकीटबंद पदार्थ दिसून येते.हे पदार्थ गृहउद्योगातून तयार केलेले असते.हे पाकीटबंद पदार्थ ताजे असल्याचाही दावा केला जातो.परंतु दक्षिण नागपुरातील एका नागरिकांकडे या पाकीटबंद इडलीतून चक्क केस निघाल्याने या पदार्थाच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.एवढेच विश्वास असलेल्या गृहउद्योगातूनच केस आदी निघत असल्याने भविष्यात या उद्योगाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही वर्षात या गृहउद्योगाचा चांगला जम बसला आहे.नागरिकही विश्वास ठेवत पाकीटबंद पदार्थ खरेदी करतात.परंतु आता या उद्योगाच्या विश्वासार्हतेलाच सुरुंग लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.केवळ पैसा कमविण्याच्या नादात या गृहउद्योगांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची प्रचिती इडलीतून केस निघाल्याने आली. गृहउद्योगाकडून अशी चूक होत असताना मोठ्या कंपन्याही मागे नसल्याचे चित्र आहे.

सिव्हिल लाईन्समध्ये मोठी डेअरी असलेल्या एका कंपनीच्या पाकीटबंद कुल्फीमधून चक्क किडे निघाल्यानेही खरेदी करणाऱ्याला धक्का बसला आहे. एवढेच नव्हे आणखी एका आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीच्या टोस्टला दुर्गंध असल्याचाही या खरेदीदाराला अनुभव आला.त्यामुळे पाकीटबंद पदार्थ आता आरोग्याला धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!