Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजमर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आदर्श आचरणात आणा.. - हरी भक्त पारायण शंकर कावळे...

मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आदर्श आचरणात आणा.. – हरी भक्त पारायण शंकर कावळे महाराज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आजची युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असून त्यामुळे समाजासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.अशा परिस्थितीत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे आदर्श आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हरी भक्त पारायण शंकर कावळे महाराज यांनी येथे केले.
देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ,श्री दत्त सेवा संस्था तथा समस्त चोप ग्रामवासी यांच्या वतीने आयोजित संगीतमय श्रीरामकथा व ग्रामगीता तत्त्वज्ञान सप्ताहात ते बोलत होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख करतांना त्यांनी सांगितले की,आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण दिल्यानंतरही अनेक मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत,ही समाजाची शोकांतिका आहे.सुसंस्कारांचे सिंचन करण्यासाठीच या श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.पित्याचे वचन पाळण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून वनवास स्वीकारणारे श्रीराम हे प्रत्येकासाठी आदर्श असल्याचे सांगून तो आदर्श आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिनांक-१४ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान सलग ३५ व्या वर्षी हा सप्ताह साजरा होत असून दररोज ध्यान-प्रार्थना,रामधून,प्रवचन,हरिपाठ आदी कार्यक्रम होत आहेत.उद्या,शुक्रवार १९ डिसेंबर रोजी शोभायात्रा तर २० डिसेंबर रोजी गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहाचे दीपप्रज्वलन सरपंच नितीन लाडे यांच्या हस्ते झाले.यावेळी आत्माराम सूर्यवंशी,दिनकर तितीरमारे,दिनेश कुर्झेकर, गोविंदराव नागपुरकर,केशव लांजेवार उपस्थित होते.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घ्यावा,असे आवाहन दत्त सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुर्झेकर,सचिव त्र्यंबक गिरीधर भजने,श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष यशवंत लांजेवार,सचिव सोमेश्वर नाकाडे,सप्ताह समितीचे अध्यक्ष राजू पुस्तोडे, सचिव मुखरु कुथे यांच्यासह मदनराव बनपुरकर, चैतन्यश्वर फुलबांधे,केशव ठाकरे,ऋषी लांजेवार, लहिराम तितीरमारे,भास्कर तितीरमारे,रामकृष्ण उईके,सुखदेव पात्रिकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!