Friday, September 4, 2026
Homeनागपूरशिक्षक मान्यता व मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रकरणातील संपूर्ण कागदपत्रांसह हाजिर हो..

शिक्षक मान्यता व मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रकरणातील संपूर्ण कागदपत्रांसह हाजिर हो..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपुर :-शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येताच बड्या माश्यांसह छोटे मासे गळाला लागले.तत्पूर्वी अनेकांनी चुप्पी साधून लाखोंची मोहमाया गोळा केली. नुसत्या एका चर्चेवरून प्रकरणाचा उलगडा झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले.नागपूरच्या शिक्षण उपसंचालक विभागात घोटाळा उघड होताच सर्वांची कामे बंद करून पुढील नंबर कुणाचा? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अश्यातच आता शिक्षक व मुख्याध्यापक भरती घोटाळ्याचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यातून पुढे सरकू लागले आहे.विशेष तपास पथकाने(एसआयटी)येथील शिक्षण विभागाकडील सर्व संबंधित फाइल्स नागपूर येथे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.आज,गुरुवार १८ डिसेंबरला भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शिक्षक मान्यता व मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रकरणातील संपूर्ण कागदपत्रांसह नागपूरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागात,तसेच संस्थाचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शिक्षक मान्यता, मुख्याध्यापक पदोन्नती,नियुक्ती आदेश,प्रस्ताव व संबंधित पत्रव्यवहाराची एसआयटीकडून कसून तपासणी केली जाणार आहे आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती असल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!