Sunday, September 20, 2026
Homeभंडारामध्यरात्री धाडसी चोरी; अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

मध्यरात्री धाडसी चोरी; अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-तीन वेगवेगळ्या ठिकाणी मध्यरात्री
अज्ञात चोरट्यांनी चोरी करून ८० हजारांची रोख रक्कम पळविल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.लाखनी शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत तहसील कार्यालयासमोर असलेल्या जयहिंद किराणा मॉल,सम्राट बार,स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या ग्राहक सेवा केंद्र अशा तीन ठिकाणी चोरट्यांनी काल ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री धाडसी चोरी केली.काल शुक्रवारी रात्री दीड ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटे हे जयहिंद किराणा दुकानाजवळ आले.त्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेले चिल्लरचे २० हजार रुपयांचे तीन बंद पिशव्यातील ६० हजार रुपये चोरले.स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या ग्राहक सेवा केंद्रातून २० हजार रुपयांची रोख रक्कम पळविली.सकाळी ही घटना उघडकीस येताच जयहिंद किराणा मॉल समोर एकच गर्दी जमली होती. अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून लाखनीचे ठाणेदार हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात लाखनी पोलिस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!