Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरमध्यरात्री थरार; जनावरांना सोडले अन् मानवाला पकडले.. - वाघाच्या हल्ल्यात इसम ठार..

मध्यरात्री थरार; जनावरांना सोडले अन् मानवाला पकडले.. – वाघाच्या हल्ल्यात इसम ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील फिस्कूटी गाव नजीक परिसरात वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार झाल्याची घटना शुक्रवारच्या मध्यरात्री उघडीस आली. वासुदेव गणपत कंकलवार वय ३६ वर्षे, रा.जुनासूर्ला, ता.मूल,जि.चंद्रपूर असे मृताचे नाव असून वर्षभरातील वन्यप्राण्याच्या हल्ल्यातील आठवा बळी ठरला आहे. वडिलोपार्जित मेंढ्या पालनाचा व्यवसाय करीत असलेले कंकलवार नेहमी जनावरे चराईसाठी न्यायचे.शुक्रवारी जनावरे चराईसाठी नेल्यावर रात्रीच्या सुमारास रामदास जंगठे यांच्या शेतात महाकाली मंदिरजवळ मेंढ्याची लाग बसवून झोपले होते.यावेळी भाऊ मारोती कंकलवार व त्यांची पत्नी वनिता कंकलवार देखील उपस्थित होत्या. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अचानक जनावरांचा आवाज आल्याने वासुदेव जागे झाले,ते बघण्यासाठी जनावरांकडे गेले असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढविला.भाऊ जागा झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला.याबाबतची माहिती त्यांच्या भावाने नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून वनविभाग आणि पोलिस ठाण्यात माहिती दिली.त्यानंतर,पोलिस ठाण्याचे पथक आणि वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून वासुदेवचा शोध घेतला असता त्याचे मृतदेह जवळच मिळून आले.दरम्यान,मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी पोलिस पथकासह भेट देऊन पंचनामा केला.यावेळी वनविभागाचे विभागीय वनाधिकारी योगेश वाघाये,सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेळके,पोंभुर्णाचे वनपरिक्षेत्राधिकारी अनंता राखुंडे,क्षेत्र सहाय्यक बी.एम दुपारे,वनरक्षक प्रिया लांडगे,वनरक्षक सोनेकर यांची उपस्थिती होती. वनविभागाने पंचनामा करून कंकलवार यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयाची तात्काळ मदत दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!