- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-भाजीपाला घेऊन भिलाई येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन अपघातात ट्रकच्या केबिनला आग लागल्याने ट्रक चालक जळून खाक झाल्याची घटना काल,सोमवार ३ फेब्रुवारीच्या रात्री चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वलनी गावाजवळ घडली.चमन ठाकूर असे अपघातात जळून खाक झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
माहितीनुसार,छत्तीसगड राज्याच्या दुर्ग जिल्ह्यातील
भिलाई या ठिकाणाहून चमन ठाकूर नामक ट्रक चालक काल,सोमवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूरला भाजीपाला वाहतूक करीत होता.लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने चालकास डुलकी आली.डुलकी येताच ट्रकवरील नियंत्रण सुटले.त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गाच्या वलनी गावाजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर ट्रक आपटला.ट्रक वेगाने असल्याने झाडाला आपटताच ट्रकच्या समोरच्या केबिनला आग लागली.आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रक चालक लागलेल्या आगीत भस्मसात झाला.सदर घटनेची माहिती रामनगर पोलिसांना कळताच त्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले.आगीचा भडका वाढू लागल्याने पोलिसांनी प्रसंगावधान साधत अग्निशामक दलास पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविले.घटनास्थळी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खरकाडे सह पोलीस पथकाने पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

