Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा- आमदार रामदास मसराम

शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा- आमदार रामदास मसराम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी धान विक्री करून दोन महिने झालीत.मात्र,अद्यापही शासन स्तरावरून धानाचे चुकारे अदा करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भेडसावत आहे.त्यामुळे शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करण्यात यावे; अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासन आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते.बरेच शेतकरी धान विक्रीपासून वंचित असल्याने शासनाने धान खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.त्यातच दोन महिन्यांपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान्य विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा झाले नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अगोदरच उसनवारी करून तसेच बँकांकडून कर्ज उचलून शेतकऱ्यांनी शेती पिकवली.धान्य विक्री चुकाऱ्यांच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड,हात उसनवारी घेतलेली रक्कम तसेच शेतीची पुढील तयारी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.चुकारे लवकर मिळणे अपेक्षित असतांनाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात धान चुकाऱ्यांची रक्कम अद्यापही आलेली नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करण्यात यावे; अन्यथा यासाठी आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!