- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-खासगी कारने भिसी येथून चिमूरकडे जात असतांना बसच्या धडकेत बसमधील एका महिलेसह नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे हे किरकोळ जखमी झाले.सदरची घटना गुरुवारच्या सायंकाळी घडली.चिमूर येथून एमएच ४० एएन ८७८० क्रमांकाची बस भिसीकडे जात होती.दरम्यान, तहसीलदार प्रताप वाघमारे हे भिसी येथून एमएच ४० एआर ७७५६ क्रमांकाच्या खासगी कारने चिमूरकडे जात होते.दरम्यान,कालव्याजवळ बसने कारला धडक दिली.या घटनेत तहसीलदार व बसमधील एक महिला किरकोळ जखमी झाली.अपघातानंतर बस रस्त्यावर आडवी झाल्याने काही तास वाहतूक ठप्प पडली होती.त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक रवी वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी जेसीबी बोलावून रस्ता मोकळा केला.
- Advertisement -

