Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमतदार बंधूंनो आक्षेप घेतांना सावधान..! आक्षेप खोटे ठरले तर मतदाराला सहा महिने...

मतदार बंधूंनो आक्षेप घेतांना सावधान..! आक्षेप खोटे ठरले तर मतदाराला सहा महिने कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-व्हीव्हीपॅट म्हणजे ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’, एखाद्या मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे; खरचं त्याच उमेदवाराला मत गेले की नाही; याची खातरजमा करण्यासाठी मतदान केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येतो.परंतु एखाद्या मतदाराने यावर आक्षेप घेतला आणि ते खोटे ठरले तर अशा मतदाराला सहा महिने कारावास आणि १ हजार रुपये दंडाची तरतूद निवडणूक आयोगाने केलेली आहे.त्यामुळे मतदार बंधूंनो आक्षेप घेतांना सावधान..! अन्यथा ते अंगलट येऊ शकते.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे.त्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हता वाढावी आणि ईव्हीएम मशीनबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनातील संशय दूर करण्यासाठी मतदाराने ईव्हीएम मशीनवर त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबल्यानंतर त्याचे मत त्याच उमेदवाराला गेले की नाही,याची पडताळणी करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येतो.यात उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबल्यानंतर त्याचवेळी उमेदवाराचे नाव,क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप मशीनमध्ये सात सेकंदापर्यंत मतदाराला दिसते.त्यानंतर आपोआप ती स्लीप कट होऊन बीप वाजतो आणि ती स्लीप सीलबंद पेटीत जमा होते.परंतु एखाद्या मतदाराला आपण ज्या उमेदवाराला मतदान केले,त्या उमेदवाराऐवजी वेगळ्याच उमेदवाराची चिठ्ठी मशीनमध्ये दिसली अशी शंका आल्यास असा मतदार आक्षेप घेऊ शकतो.आक्षेप खरा ठरला तर मतदान थांबविले जाते.आणि जर आक्षेप खोटा ठरला तर त्या मतदारावर कार्यवाही केली जाणार आहे.
एकदा मतदान केल्यानंतर मतदाराने आक्षेप घेतल्यास अशा मतदाराकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल, त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा उमेदवाराला चाचणी मत नोंदविण्याची परवानगी देऊन सोबतच चिठ्ठयांचे सर्वांसमोर निरीक्षण केले जाणार आहे. अशावेळी आक्षेप खोटा आढळल्यास कलम ४९ एमए अंतर्गत अशा मतदारांवर सहा महिने तुरुंगवास व एक हजार रुपये दंडाची तरतूद निवडणूक आयोगाने केलेली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!